मधुमेहासाठी औषध गोळ्या सल्फोनिलयुरिया (Sulfonylureas) Sulfonylureas Oral Medication For Diabetes (Aushadh Marathi Info)

diabetes मधुमेह औषध sulfonylureas oral medication aushadh  Marathi (diabecity.com)

सल्फोनिलयुरिया (Sulfonylureas)

सल्फोनिलयुरिया औषधे कशी घ्यावीत? डोस (Dose) काय? दुष्परिणाम (Side Effects) कोणते?

सल्फोनिलयुरिया या प्रकारातली औषधे स्वादुपिंडातील (pancreas मधील) बीटा पेशींना उत्तेजित करून अधिक प्रमाणात इन्सुलिन निर्माण करायला भाग पाडतात.

सल्फोनिलयुरिया (Sulfonylureas - Daonil) डोस (Dose)

डॉक्टर ठरवतील

आगाऊ काळजी (Precautions)

तुम्हाला काही इन्फेक्शन (उदा. सततचा खोकला, ताप इ.), सहज होणारा रक्तस्त्राव, पोटदुखी, पिवळी त्वचा किंवा डोळे, गडद रंगाची लघवी, विनाकारण वाटणारा थकवा, अशक्तपणा, अचानक होणारी वजनवाढ किंवा घट, सतत बदलणारा मूड, हाता-पायावरची सूज वगैरे असेल तरीही त्याची आगाऊ कल्पना डॉक्टरांना औषध प्रिस्क्राइब करण्याआधी द्या.

दुष्परिणाम (Side Effects)

सल्फोनिलयुरिया या प्रकारातल्या औषधांचे दुष्परिणाम असे असू शकतात: सर्वात महत्वाचा दुष्परिणाम म्हणजे हायपोग्लायसेमिया (Hypoglycemia)! त्याबद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे. इतर दुष्परिणाम असे असू शकतात: उलट्या, मळमळ, भूक कमी होणे, जुलाब, बद्धकोष्ठता, पोटात अस्वस्थता, डोकेदुखी, वजनवाढ. हे दुष्परिणाम सर्वांनाच होतील असे नाही. तुमच्या डॉक्टरने हे औषध तुम्हाला घ्यायला सांगितले आहे कारण त्याच्या मते या औषधाचे तुमच्या मधुमेहावरील उपचारात होणारे फायदे हे दुष्परिणामापेक्षा जास्त आहेत असे त्याला वाटल्यामुळे हे लक्षात ठेवा. तथापि, हे दुष्परिणाम लक्षात आल्यावर लगेच डॉक्टरला याची कल्पना द्या. या गटातल्या औषधांच्य दुष्परिणामांची ही यादी परिपूर्ण नाही. तुम्हाला यापेक्षा वेगळे दुष्परिणाम जाणवू शकतात. ते लगेच डॉक्टर आणि फार्मासिस्टच्या लक्षात आणून द्या.

दुष्परिणाम (Side Effects): हायपोग्लायसेमिया (Hypoglycemia)

या औषधामुळे रक्तातली साखर अचानक कमी होऊ शकते. या औषधांचा डोस थोडा जास्त झाला, किंवा जेवणात कॅलरीज थोड्या कमी पडल्या किंवा थोडा व्यायाम जास्त झाला तर रक्तातली ग्लुकोज साखर धोकादायक पातळीपर्यंत खाली येऊ शकते, ज्याला हायपोग्लायसेमियाचा (hypoglycemia) म्हणतात. हायपोग्लायसेमियाची लक्षणे अशी आहेत: अचानक घाम येणे, चक्कर येणे, हातपाय थरथर कापणे, खूप भूक लागणे, हृदयाची धडधड वाढणे, नजर अंधूक होणे, हातापायाला मुंग्या येणे, ओठ आणि जिभेला मुंग्या येणे, चिडचिड होणे इ.

हायपोग्लायसेमियावरील उपाय (How to manage hypoglycemia) आणि महत्वाची सूचना:

लक्षात असू द्या की वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचा रक्तातल्या साखरेवर होणारा परिणाम वेगवेगळा असतो. अशा वेळी हायपोग्लायसेमिया (hypoglycemia) चा धोका संभवतो. म्हणून एखादे औषध पहिल्यांदा घेत असाल तर गाडी वगैरे चालवण्याआधी ग्लुकोमीटरने साखर तपासून मग गाडी चालवा. सोबत ग्लुकोज साखर, खडीसाखर, पार्ले-जी बिस्किटांचा पुडा किंवा पिकलेली केळी, आंबा, कोल्ड्रिंक, चॉकलेट असे पटकन साखर वाढवणारे पदार्थ नेहमी जवळ बाळगा. अशा वेळी जास्त कोंडा असणारे किंवा साखर हळूहळू वाढवणारे पदार्थ टाळा! उदा. डायजेस्टिव बिस्किटे, डायट कोक, टोमॅटो, भाज्या, तळलेले पदार्थ वगैरे अशावेळी खाऊ नये. ज्या औषधामुळे हायपोग्लायसेमिया होऊन रक्तातली साखर कमी झाली त्या औषधाबद्दल आणि किती डोस घेतला होता ते डॉक्टरला कळवा ज्यायोगे ते तुम्हाला डोस किंवा औषध बदलून देतील किंवा आणखी काही महत्वाचा सल्ला देतील

 

सल्फोनिलयुरिया या प्रकारातील वेगवेगळी औषधे अशी आहेत:

Glibenclamide ग्लिबेनक्लामाइड जेनेरिक स्वस्त औषधांची यादी:

List of Glibenclamide Cheap Generic Drugs

Brand Name Drug Name Company Name Packing Price Rs.
Glybovin tab Glibenclamide 1.25mg GENETICA (ARISTO) 10 2.23
Semi codica tab Glibenclamide 2.5mg NICHOLAS 10 2.75
Semi-glyboral tab Glibenclamide 2.5mg U.S.V. 10 2.82
Glybovin tab Glibenclamide 2.5mg GENETICA (ARISTO) 10 2.93
Glucosafe tab Glibenclamide 2.5mg SUN PHARMA 10 2.99
Betanase tab Glibenclamide 5mg CADILA-H 10 3.73
Codica tab Glibenclamide 5mg NICHOLAS PIRAMAL 10 4.41
Glyboral tab Glibenclamide 5mg U.S.V. 10 4.78
Semi daonil tab Glibenclamide 2.5mg SANOFI AVENTIS 10 4.84
Glybovin tab Glibenclamide 5mg GENETICA (ARISTO) 10 4.93
Glucosafe tab Glibenclamide 5mg SUN PHARMA 10 4.99
Semi euglucon tab Glibenclamide 2.5mg NICHOLAS 10 6.00
Daonil tab Glibenclamide 5mg SANOFI AVENTIS 10 6.62

Glipizide ग्लिपिझाइड जेनेरिक स्वस्त औषधांची यादी:

List of Glipizide Cheap Generic Drugs

Brand Name Drug Name Company Name Packing Price Rs.
Lipi tab Glipizide 2.5mg DEY'S 10 3.10
Glez tab Glipizide 2.5mg GENETICA(ARISTO) 10 3.15
Glyzip tab Glipizide 2.5mg STADMED 10 3.23
Glysin tab Glipizide 2.5mg MARC LAB 10 4.70
Lipi tab Glipizide 5mg DEY'S 10 4.83
Diacon tab Glipizide 5mg BAL PHARMA 10 4.86
Glez tab Glipizide 5mg GENETICA(ARISTO) 10 4.90
Glucolip tab Glipizide 5mg WALLACE 10 4.90
Glyzip tab Glipizide 5mg STADMED 10 5.02
Glide tab Glipizide 5mg FRANCO INDIAN 10 5.04
Semi-glynase tab Glipizide 2.5mg U.S. VITAMINS 10 5.35

Glimepiride ग्लिमेपिराइड जेनेरिक स्वस्त औषधांची यादी:

List of Glimepiride Cheap Generic Drugs

Brand Name Drug Name Company Name Packing Price Rs.
Prides tab Glimepiride 1mg Korpan 10 9.52
Glimkap tab Glimepiride 1mg Kapl 10 10.19
Gepride tab Glimepiride 1mg Vazokare(medley) 10 11.90
Glycirid tab Glimepiride 1mg Indi pharma 10 12.50
Isryl tab Glimepiride 1mg Systopic 10 13.00
Glucoryl tab Glimepiride 1mg Mediva( alkem) 10 15.00
Azulix tab Glimepiride 1mg Torrent 10 16.54
Daoryl cap Glimepiride 1mg J.b. Chemical 10 17.50
Glimpinor tab Glimepiride 1mg Norris 10 19.36
Glimiprex tab Glimepiride 1mg Aristo 10 19.50
Gempride-1 tab Glimepiride 1mg Genetic pharma 10 19.90
Gilly tab Glimepiride 1mg Octane biotech 10 20.00
Gleam tab Glimepiride 1mg Franco indian 10 20.00
Glyree tab Glimepiride 1mg IPCA 10 20.50
Zoryl tab Glimepiride 1mg Intas 10 21.00
Dibiglim tab Glimepiride 1mg Novartis 10 22.00
Prichek tab Glimepiride 1mg Indoco 10 22.46
Gitae tab Glimepiride 1mg Dr. John's lab 10 22.50
Glimpid tab Glimepiride 1mg Stancare 10 22.50

तुम्ही आहात पाहुणा क्रमांक: